spot_img
spot_img

अटलांटिक महासागरात ‘हंताव्हायरस’ची दहशत

झुंजार सेनापती l वृत्तसंस्था 
अटलांटिक महासागरात धावणाऱ्या आलिशान क्रूझवरून एक धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक बातमी समोर येत आहे. ‘MV होंडियस’ नावाच्या जहाजावर Hantavirus चा शिरकाव झाल्याचा दावा करण्यात येत असून, आतापर्यंत तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. या जहाजावर तब्बल २३ देशांतील १४९ प्रवासी अडकले असून, भीतीचे सावट संपूर्ण जहाजावर पसरल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिलपासून जहाजावर आजारपणाची मालिका सुरू झाली. सुरुवातीला एका प्रवाशाचा मृत्यू झाला, त्यानंतर मृतांचा आकडा तीनवर पोहोचला. मृतांमध्ये एका डच दांपत्याचा आणि एका जर्मन नागरिकाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. तसेच एका ६९ वर्षीय ब्रिटिश नागरिकाला या विषाणूची लागण झाल्याची माहिती पुढे आली असून, त्याच्यावर सध्या दक्षिण आफ्रिकेत उपचार सुरू आहेत.
दरम्यान, संसर्गाच्या भीतीने Cape Verde सरकारने या जहाजावरील प्रवाशांना किनाऱ्यावर उतरू देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे हे जहाज सध्या समुद्रातच थांबले असून, प्रवाशांमध्ये भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

विठुरायाच्या दर्शनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 'पंढरपूर कॉरिडॉर' प्रकल्पाची...

विठुरायाच्या दर्शनासाठी आधुनिक सुविधा; पंढरपूर कॉरिडॉर उभारणार

⬤ झुंजार सेनापती l पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!