spot_img
spot_img

अजितदादांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत कलह ; पटेल-तटकरे भाजपच्या वाटेवर

झुंजार सेनापती l मुंबई

राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेतृत्वाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आता अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. पक्षात अस्वस्थ असलेले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

याचदरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी २२ आमदारांसह तटकरे आणि पटेल हे भाजपकडून निवडणूक लढवू शकतात, असा दावा केल्याने राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तटकरे आणि पटेल यांचे संघटनात्मक महत्त्व कमी करण्यास सुरुवात झाल्याची चर्चा पक्षात रंगली आहे. पक्षाकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांची जी यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली, त्यामध्ये प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीत नावांचा समावेश असला तरी पदनामाचा उल्लेख नसल्याने पक्षात नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी तांत्रिक चूक झाल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, पार्थ पवार यांनी तटकरे आणि पटेल यांचे राजकीय महत्त्व कमी करण्यात आल्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे.
पक्षातील हा वाद आणखी वाढल्यास तटकरे, पटेल यांच्यासह काही नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!