spot_img
spot_img

शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व केबल चोरीला आळा घाला नेकनूर पोलीस ठाण्यात निवेदन

रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांवर कठोर कारवाईची मागणी

झुंजार सेनापती | बीड l प्रतिनिधी 

बीड तालुक्यातील खडकी घाट व तांदूळवाडी घाट परिसरातील शेतकरी सध्या विद्युत मोटारी आणि केबल वायर चोरीच्या वाढत्या घटनांमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. रात्रीच्या वेळी शेतातील तसेच तलाव परिसरातील विद्युत मोटारी, स्टार्टर, केबल वायर व इतर कृषी साहित्य चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
आधीच शेतीतील वाढते उत्पादन खर्च, अनियमित पाऊस आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या चोऱ्या आणखी डोकेदुखी ठरत आहेत. अनेक शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे पिकांचेही नुकसान सहन करावे लागत आहे.
या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आज परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने नेकनूर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिसांनी रात्रीच्या वेळी नियमित गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे, चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, चोरीच्या घटना रोखण्यासाठी त्वरित प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर तीव्र लोकआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

Related Articles

बालाघाटावर केबल चोरांचा धुमाकूळ; एकाच रात्री ५० ते ६० शेतकऱ्यांच्या केबल वायरची चोरी

⬤ झुंजार सेनापती | बीड  : बालाघाटावरील नेकनूर परिसरात केबल चोरांनी मोठा धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल ५० ते ६० शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबल...

कर्जमुक्ती योजनेत ई-केवायसीला वेग; ८.३३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

⬤ झुंजार सेनापती l मुंबई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना (२०२६) अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) अभियान राज्यभर वेगाने सुरू असून, ३१...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!