झुंजार सेनापती | मुंबई
गोमंतक हिंदू तेली समाजाच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात बिचोलीम येथे पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर होते. प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, तसेच डॉ. अरुण भस्मे, रजनीश गुप्ता यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून समाजातील एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक विकासाच्या विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. समाजाची एकजूट अधिक मजबूत करून सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन अनिल वेंगुर्लेकर, कृष्णा डीचोलकर आणि सत्यवान सातरडेकर यांनी केले.
“समाजाच्या एकजुटीसाठी आणि प्रगतीसाठी आपण सदैव कटिबद्ध राहू,” असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी केले.



