spot_img

वनमंत्री गणेश नाईक यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी; पीक नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील करपटवाडी (ढाढरे) येथे भेट देत आदिवासी आणि शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या या दौऱ्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाच्या पाठबळाचा विश्वास मिळाला.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन भात, उडीद, नागली आणि खुरासनी या पिकांची पाहणी केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती घेत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दिवाळीच्या सणात मंत्र्यांनी थेट ग्रामीण भागात येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
ढाढरे ग्रामपंचायतीच्या वतीने वनमंत्री गणेश नाईक यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी बांधवांना अन्नधान्याच्या किटचे आणि दिवाळी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
संवाद सभेत माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शेतकऱ्यांना दिलासा देताना, शंभर टक्के शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
या दौऱ्यात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, शहापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, गटविकास अधिकारी बी. एच. राठोड, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव यांच्यासह वन, महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

भर उन्हात मुख्यमंत्र्यांची शेताच्या बांधावर हजेरी; बळीराजाला दिला विश्वासाचा दिलासा!

⬤ झुंजार सेनापती l नागपूर, दि. ८ : नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी थंडीचा अद्याप पत्ता नाही. दिवसा उन्हाचा कडाका कायम असतानाही मुख्यमंत्री...

शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! विंधन विहिरी खोदण्यावरील बंदी १५ डिसेंबरपर्यंत उठवली

⬤ झुंजार सेनापती l मुंबई नागपूर, दि. ८ : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि निर्माण झालेल्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!