⬤ झुंजार सेनापती l मुंबई
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा राज्यात एकूण २१ सीईटी परीक्षा घेतल्या जाणार असून, त्यापैकी ११ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम), पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (पीजीसीएम) आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (जीएनएम) या तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रथमच सीईटी घेतली जाणार आहे. जानेवारी २०२७ मध्ये प्रवेश परीक्षांना सुरुवात होणार असून, १० जून २०२७ पर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडणार आहेत.२०२६ मध्ये झालेल्या २० सीईटी परीक्षांसाठी १८ लाख १४ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख ३१ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापूर्वी तीन अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी घेण्यात येत होती. यंदा त्यामध्ये आणखी आठ अभ्यासक्रमांची भर घालण्यात आल्याने दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणाऱ्या अभ्यासक्रमांची संख्या ११ वर पोहोचली आहे.२०२६ मध्ये झालेल्या २० सीईटी परीक्षांसाठी १८ लाख १४ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख ३१ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापूर्वी तीन अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी घेण्यात येत होती. यंदा त्यामध्ये आणखी आठ अभ्यासक्रमांची भर घालण्यात आल्याने दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणाऱ्या अभ्यासक्रमांची संख्या ११ वर पोहोचली आहे.राष्ट्रीय स्तरावर जेईई मेनच्या दोन परीक्षा घेतल्या जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही अधिक संधी मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पीसीएम, पीसीबी, एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम, पाच वर्षीय एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी घेतली जाणार आहे.विद्यार्थ्यांना पहिली सीईटी देणे बंधनकारक असून, दुसरी परीक्षा ऐच्छिक राहणार आहे. दोन्ही परीक्षा दिल्यास प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या परीक्षेत अधिक पर्सेंटाइल गुण मिळतील, तेच गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेतील कामगिरी सुधारण्याची आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे.दोन वेळा होणाऱ्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकएमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम : पहिली परीक्षा २८ ते ३० जानेवारी २०२७; दुसरी परीक्षा १ ते ३ एप्रिल २०२७.पाच वर्षीय एलएलबी : पहिली परीक्षा २८ ते २९ मार्च; दुसरी परीक्षा २४ मे २०२७.पीसीबी समूह : पहिली परीक्षा ८ ते १३ एप्रिल; दुसरी परीक्षा ६ ते ८ मे २०२७.पीसीएम समूह : पहिली परीक्षा १६ ते २६ एप्रिल; दुसरी परीक्षा १० ते १५ मे २०२७.बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम : पहिली परीक्षा २८ ते ३० एप्रिल; दुसरी परीक्षा २७ ते २८ मे २०२७.अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रकएम.एचएमसीटीची परीक्षा २४ मार्च, एमसीए २७ मार्च, एएसी (कला शिक्षण) ११ एप्रिल, बी.डिझाईन १८ एप्रिल, तीन वर्षीय एलएलबी ४ व ५ मे, डीपीएन/पीएचएन १८ मे, नर्सिंग १८ व १९ मे, जीएनएम नर्सिंग २१ व २२ मे, एमपीएड ५ जून, एमएड ६ जून रोजी होणार आहे. तर बीएड (जनरल व स्पेशल), बीएड (ईएलसीटी) आणि बीपीएड या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ८ ते १० जून २०२७ दरम्यान घेण्यात येणार आहेत.दरम्यान, तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएड अभ्यासक्रमाची सीईटी यंदा घेतली जाणार नाही. राज्यात हा अभ्यासक्रम केवळ एका संस्थेत सुरू असून, एकूण ५५ जागांपैकी यंदा केवळ १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच एमपीएड, एमएड आणि बीएडच्या परीक्षा जून महिन्यात घेण्यात याव्यात, अशी विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांची मागणी होती. त्यानुसार या परीक्षा जूनमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.सीईटी कक्षाने जाहीर केलेले वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या अंतिम तारखा, अर्ज प्रक्रिया आणि पुढील सूचनांसाठी सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.अधिकृत संकेतस्थळ : https://cetcell.mahacet.org/


