- झुंजार सेनापती l मुंबई
- मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज आहे. लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. मतदान मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक व शांततामय वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती श्री. यादव यांनी सांगितले.
- दहा विधानसभा मतदारसंघात एकूण १०५ उमेदवार
- मुंबई शहर जिल्ह्यात २५ लाख ४३ हजार ६१० मतदार, तर २ हजार ५३८ मतदान केंद्रे
- मुंबई शहर जिल्ह्यात मतदानासाठी सुमारे १२ हजार ५०० कर्मचारी
- विधानसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या दहा विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदार केंद्राला प्रत्येकी एक असे २५३८ बीएलओ आहेत. एकूण ३६४ क्षेत्रीय अधिकारी (Z.O) आहेत. जवळपास १२ हजार ५०० पेक्षा अधिक मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध आहे.
- मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांची माहिती
- एकूण मतदार :- २५ लाख ४३ हजार ६१०
- महिला – ११ लाख ७७ हजार ४६२
- पुरुष – १३ लाख ६५ हजार ९०४
- तृतीयपंथी– २४४
- ज्येष्ठ नागरिक (८५+) – ५३ हजार ९९१
- नवमतदार संख्या (१८-१९ वर्ष)– ३९ हजार ४९६
- दिव्यांग मतदार – ६ हजार ३८७
- सर्व्हिस वोटर – ३८८
- अनिवासी भारतीय मतदार – ४०७
- विधानसभा मतदार संघनिहाय मतदार संख्या
- धारावी – २६१८६९
- सायन-कोळीवाडा – २८३२७१
- वडाळा – २०५३८७
- माहिम – २२५९५१
- वरळी – २६४५२०
- शिवडी – २७५३८४
- भायखळा – २५८८५६
- मलबार हिल – २६११६२
- मुंबादेवी – २४१९५९
- कुलाबा – २६५२५१
- —
- मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रे
- एकूण मतदान केंद्र – २५३८
- उत्तुंग इमारतीमधील (Highrise Building) मतदान केंद्र – १५६
- सहकारी गृहनिर्माण सोसायटी मधील मतदान केंद्र – १००
- झोपडपटटी परिसरात मतदान केंद्र – ३१३
- मुंबई शहर जिल्ह्यात मंडपातील मतदान केंद्र – १०१
- पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्र – १७
- एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र:- ०१
- एकूण सखी महिला मतदान केंद्रः- १२
- नवयुवकांसाठी मतदान केंद्रः- १२
- दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र :- ०८
- —
- ईव्हीएम
- अ) Ballot Unit – ३०४१
- ब) Control Unit – ३०४१
- क) VVPAT – ३२९४
- मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध
- मुंबई शहर जिल्ह्यात २५३८ मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी प्रशासनातर्फे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. किमान सुविधा (Assured Minimum Facilities) अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदारांसाठी स्वच्छतागृह, प्रतिक्षालय, रांगा लागल्यास ठराविक ठिकाणी मतदारांना बसण्यासाठी व्यवस्था, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, रॅम्प, मदतीसाठी दिव्यांग मित्र स्वयंसेवक, मैदानाच्या ठिकाणी मंडप, कचरापेटी, पंखे,इ. साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे.