झुंजार सेनापती l पुणे l प्रतिनिधी
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी केली आहे.
रविवारी १६ मार्च रोजी देहू नगरीत साजरा होत असलेल्या पवित्र बीज सोहळ्यात वारकऱ्यांच्या उपस्थितीत नामदार शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे,’ असे
देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज यांनी सांगितले. देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे या वेळी उपस्थित होते.