spot_img
34.9 C
New York
Tuesday, July 8, 2025

Buy now

spot_img

मुंबई क्रीडा कार्यालयाच्या वतीने विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

 झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध क्रीडा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ एप्रिल ते ९ मे २०२५ या कालावधीत विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या उपक्रमामध्ये हैंडबॉल, बास्केटबॉल, वुशू, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग आणि फुटबॉल या खेळांचा समावेश आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन मुंबई उपनगराच्या जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे.

प्रशिक्षण स्थळे आणि वेळा पुढीलप्रमाणे:

बास्केटबॉल: जिकेपी बास्केटबॉल कोर्ट, आचार्य अत्रे मैदान, पंतनगर, घाटकोपर (पूर्व) येथे सायंकाळी ४.४५ ते ६.००

हँडबॉल: विभागीय क्रीडा संकुल, चिकूवाडी, मुंबई पब्लिक स्कूलसमोर, सायंकाळी ४ ते ६

फुटबॉल: होली पब्लिक स्कूल, अंधेरी येथे सायंकाळी ४ ते ६

पॉवरलिफ्टिंग व वेटलिफ्टिंग: फिटनेस पॉईंट जिम, भांडूप पश्चिम येथे दुपारी ३ ते ६

वुशू: श्री नारायण गुरु हायस्कूल, चेंबूर व एस.आय.इ.एस., घाटकोपर येथे दुपारी १२.३० ते १.३०

शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर, भक्ती आंब्रे, क्रीडा कार्यकारी अधिकारी प्रीती टेमघरे व शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मनिषा गारगोटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी  मनिषा गारगोटे – ८२०८३७२०३४, श्रीमती प्रीती टेमघरे – ९०२९०५०२६८ यांना संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

Related Articles

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील  राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील...

फळपिक विमा योजनेचे अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

झुंजार सेनापती l मुंबई हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!