spot_img
spot_img

माहिती व जनसंपर्क’ मधील नवनियुक्त उपसंचालकांचा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते सत्कार

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

मुंबई  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात पदोन्नतीने नियुक्त झालेल्या उपसंचालक (माहिती) यांचा प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) श्री. र.बा.गिते, उपसंचालक (माहिती) श्री. देवेंद्र लक्ष्मण पाटील, उपसंचालक (माहिती) श्रीमती मीनल शशिकांत जोगळेकर, उपसंचालक (माहिती) श्रीमती कीर्ती प्र. मोहरील-पांडे आणि उपसंचालक (माहिती) श्रीमती वर्षा संतोष आंधळे या नवनियुक्त उपसंचालकांचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर येथील विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) श्री. प्रविण टाके व पुणे येथील विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) पदावर श्री. किरण मोघे यांची नियुक्ती झाली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सर्व उपसंचालकपदी नवनियुक्त अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व संघभावनेने कार्य करून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कार्य अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

यावेळी संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागूल, संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, संचालक (माहिती) ( वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे उपस्थित होते.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!