spot_img
29.3 C
New York
Tuesday, July 8, 2025

Buy now

spot_img

वारकरी संप्रदायात मृदंग,किर्तन,भजनाचे मालक श्री बंकटस्वामी होते

रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर

झुंजार सेनापती l सुरेश जाधव

जोग महाराजा सारख्या स्वामी ने बंकटसिंह सारख्या सेवकच ऐकलं म्हणून वारकरी शिक्षण संस्था झाली.स्वामी पणाची मजा सेवा करण्यामध्ये आहे..स्वामी महाराज यांनी जोग महाराज यांची एकनिष्ठ सेवा केली.त्यामुळे जोग महाराजासारख्या स्वामीवरी सत्ता केली अस प्रतिपादन श्री ह भ प रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी केले.संत बंकट स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवात सहाव्या दिवसाचे कीर्तन पुष्पगुंपताना ते बोलत होते.यावेळी प्रमुख उपस्थिती महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, प्रमुख उपस्थिती 

श्रीक्षेत्र नगद नारायण गडाचे उत्तर अधिकारी संभाजी महाराज नारायणगडकर,लक्ष्मण महाराज तकिक,बळीराम महाराज आवटे 

,मुरलीधर महाराज बारगजे ,परमेश्वर महाराज सोजे माजलगाव ,भागवत महाराज शिंदे,परमेश्वर महाराज बोधले ,रामेश्वर महाराज बोधले ,अण्णा महाराज बोधले,पंढरीनाथ महाराज,हरिहर महाराज विहिगाकर ,स्वामी स्वरूपंद सरस्वती,विठ्ठल महाराज आंधळे शास्त्री यांच्यासह हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.

बीडच्या श्रीक्षेत्र नेकनूर येथे वारकरी संप्रदायातील महान संत बंकटस्वामी महाराज यांच्या ८१ व्या पुण्यतिथी उत्सवात उपांत्य दिवसाचे कीर्तन पुष्प महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री ह भ प रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी संत तुकाराम महाराज यांच्या 

देव वसे चित्ती | त्याची घडावी संगती ||१||

ऐसे आवडते मना | देवा पुरवावी वासना ||२||

हरिजना सवे भेटी | नहो अंगसंग तुटी ||३||

तुका म्हणे जिणे | घडो संतसंगष्टणे ||४||

या अभंगावर सुंदर चिंतन मांडले. माणसाचे जीवन संगती प्रधान आहे.गरिबी जो पर्यंत येणार नाही तो पर्यन्त श्रीमंतीची किंमत राहणार नाही.सेवा केल्या शिवाय स्वामी होता येत नाही.स्वामीं म्हणजे मालक आणि संत बंकटस्वामी महाराज वारकरी संप्रदायाचे मालक होते. बंकटस्वामी 18 महिने आईच्या पोटात सेवा केली.स्वामी पणाची मजा सेवा करण्यामध्ये आहे. स्वामी महाराज यांनी जोग महाराज यांची एकनिष्ठ सेवा केली. स्वामी गुरू निष्ठ होते त्यामुळे विश्वासे तो करी स्वामीवरी सत्ता या अभंगाप्रमाणे जोग महाराज सारख्या स्वामी ने बंकटस्वामी सारख्या सेवकच ऐकलं म्हणून वारकरी शिक्षण संस्था झाली. अस संजय महाराज पाचपोर म्हणाले.स्वामींनी सेवकाला सेवक नाही तर स्वामी केलं..

कृपा कटाक्षे न्याहाळीले आपल्या पदी बैसविले. या संतोक्ती प्रमाणे जोग महाराज यांनी बंकटसिंह ला बंकटस्वामी बनवल.

संत बंकटस्वामी वारकरी संप्रदायात मृदंग, किर्तन भजनाचे स्वामी होते.दुसऱ्याच्या चाली नाही स्वतः रचल्या आणि गोड काकडा भजन जन्माला आहे. महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार गायक वादक हे रंग आहेत संत बंकटस्वामी हे त्यांचे स्वामी आहेत. म्हणून तर तू माझा स्वामी मी तुझा रंक ! पाहता न दिसे वेगळीक !!  

स्वामीच्या पुण्यतिथी मध्ये दुसऱ्याची संगती कशाला मागणार हेच अभंगाच्या पहिल्या चरणात  देव वसे चित्ती ! त्याची घडावी संगती!!

संतांचा बहिरंग बिघडला असेल मात्र अंतरंग वेगळ आहे.परमार्थात अंतरंगाला महत्व बाह्यरंग बिघडला तरी चालेल पण अंतरंग बिघडू देऊ नका..उद्धार आणि पतन संगतीचा महिमा आहे. जन्म आणि मृत्यू पेक्षा जगणं महत्वाच आहे.चांगल जगायचं असेल तर संत संगती महत्वाची आहे. अस पाचपोर महाराज म्हणाले.. यावेळी सीमेवर संरक्षण करताना शहीद झालेल्या शहिदांना कीर्तनाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आले..

पहेलगम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व पाकिस्तान सोबत युद्धात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तारुण्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना राहू द्या.. आजचे कीर्तन हा संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताह त्या शहिदांच्या स्मृती विनम्र अभिवादन करून कायम रुणात राहील असेही संजय महाराज म्हणाले. 

यावेळी साथ संगत संगीत अलंकार ज्ञानेश्वर माऊली आवटे, संगीत विशारद तुळशीराम आतकरे गुरुजी, मृदुंग सात कृष्णा महाराज साळुंखे यांच्या सहभागी महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक यांची  उपस्थिती होती.

Related Articles

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील  राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील...

फळपिक विमा योजनेचे अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

झुंजार सेनापती l मुंबई हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!