spot_img
spot_img

मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ५१ लाखाची बनावट देशी दारू पकडली

झुंजार सेनापती l मुंबई

मुंब्रा-पनवेल रोडमुंद्राशिळफाटा (ता. जि. ठाणे) येथे बेकायदेशीररित्या बनावट देशी दारुचा साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने ५ जून रोजी कारवाई केली. या कारवाईत एकूण ५१ लाख ३२ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 मुंब्रा-पनवेल रोडमुंब्राशिळफाटा या परिसरातून गोवा राज्यातील बनावट देशी दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावरुन निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या टीमने सापळा रचत चॉकलेटी रंगाचा आयशर कंपनीच्या क्र. जीजे-०६-बीव्ही-५८२२ या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा राज्यातील बनावट देशी दारुचे ९० मिलीचे १२१ बॉक्स व १८० मिलीचे ७२९ बॉक्स जप्त केले. यामध्ये आरोपी लक्ष्मण सिंह नाथू सिंह राठोडवय ३७ वर्षेरा. बस्सीता. सलुंबरजि. उदयपुर (राजस्थान) यास अटक करुन परराज्यातील बनावट देशी दारु वाहतुकीसाठी वापरलेला चॉकलेटी रंगाचा आयशर कंपनीच्या वाहनासह गोवा राज्यातील बनावट देशी दारुचे एकूण ८५० बॉक्सएक मोबाईल व एका वाहनासह अंदाजे किंमत ५१,३२,९४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात सह आयुक्त प्रसाद सुर्वेविभागीय उपआयुक्त प्रदीप पवारठाणे अधीक्षक प्रविण तांबे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक दिगंबर शेवाळेदुय्यम निरीक्षक श्री. यादवरिंकेश दांगटव्हि. व्हि. सकपाळसहा. दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकरतसेच जवान श्रीराम राठोडहनुमंत गाढवेअमीत सानपकुणाल तडवीहर्षल खरबस यांनी यशस्वीरित्या पार पाडली. दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव हे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

जीएसटी अधिकारी मृत्यू प्रकरण; मुख्य आरोपी प्रदीप फाटे पुण्यातून अटकेत

झुंजार सेनापती l मुंबई बीड जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील...

आखाती देशांतील तणाव; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकार सतर्क

झुंजार सेनापती l मुंबई आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री Devendra Fadnavis...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!