spot_img

राज्यात अत्याधुनिक सुविधांसह क्रीडा संकुले उभारणार

- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

 राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी अत्याधुनिक सुविधांसह तालुका व जिल्हा क्रीडा संकुले उभारणीची कामे करावीत, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे राज्य क्रीडा विकास समितीची बैठक झाली. यावेळी राज्याच्या क्रीडा धोरणांतर्गत, क्रीडा योजनांमध्ये सुधारणा करणे, नवीन धोरणांमध्ये अभिप्रेत असलेल्या योजनांना मान्यता देणे, विभागाच्या क्रीडा सुविधा हाती घेणे तसेच क्रीडा योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी क्रीडा विभागाचे प्रभारी आयुक्त सुधीर मोरे, उपसचिव सुनील पांढरे यांच्यासह महसूल, वित्त, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात ३८० तालुक्यात ४२५ क्रीडा संकुलास मान्यता असून, पूर्ण झालेल्या १६२ क्रीडा संकुलात जास्तीत जास्त खेळाडूंना सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न करावेत. उर्वरित क्रीडा संकुलाची कामे जलदगतीने पूर्ण करून खेळाडूंसाठी ती उपलब्ध करून द्यावीत.

याचबरोबर मुंबई शहर, उपनगर, धारावी, कळवा, ठाणे येथील क्रीडा संकुलाच्या नूतनीकरण व उभारणीसंदर्भात जलदगतीने कार्यवाही करावी. कराड, कल्याण, अंबरनाथ, चंद्रपूर येथील क्रीडा संकुलाच्या उभारणीबाबत तसेच १२८ तालुक्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या १५० क्रीडा संकुलांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिले.

०००

Related Articles

पशुधनासाठी चारा लागवडीला शासनाचे प्रोत्साहन; सात नवीन चारा पिकांचा योजनेत समावेश!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत वैयक्तिक तसेच...

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आधार व स्वयंम योजनांचे नूतनीकरण सुरू!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यातील ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ आणि ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ यांचा लाभ घेणाऱ्या विद्यमान विद्यार्थ्यांनी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!