spot_img
7.3 C
New York
Friday, November 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी बृहत आराखडा सादर करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

झुंजार सेनापती l मुंबई

पुण्यातील हिंजवडी ‘आयटी’ पार्क परिसरातील वाहतूक कोंडीपूरस्थिती तसेच पिण्याच्या पाण्यासह सर्व समस्या सोडविण्यासाठी पुणे ‘मनपा’पिंपरी चिंचवड ‘मनपा’पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि ‘एमआयडीसी’ने योग्य समन्वयाने नियोजन करावे. उपलब्ध संसाधनाद्वारे नागरिकांना चांगली सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. विविध समस्यांवर तोडगा काढून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी बृहत आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

हिंजवडी ‘आयटी’ पार्कमधील विविध समस्यांबाबत विधानभवनमध्ये आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारनगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळसर्वश्री आमदार शंकर जगतापशंकर मांडेकरमहेश लांडगेनगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ताप्रधान सचिव गोविंदराजविभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुणे मनपा आयुक्त नवलकिशोर रामपिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त शेखर सिंहपुणे महानगर विकास प्राधिकरण आयुक्त योगेश म्हसेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलउद्योग विकास आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह विविध विभागाचे अधिकारीहिंजवडी येथील रहिवासी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीहिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हजारो आयटी अभियंतेनागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात वाहतूक कोंडीत भर पडते ही समस्या सोडविण्यासाठी या भागांत रस्तेरिंगरोडउड्डाणपूलसार्वजनिक वाहतूकपार्किंग यंत्रणामेट्रोची प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या. कस्पटेवस्ती ते हिंजवडी फेज ३ पर्यंतचा रस्ता वेगळा केल्यास वाहतूक कोंडी कमी होईलसर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करावेत. म्हाळुंगे आयटी सीटीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा. रस्ते रूंदीकरणासाठी योग्य मोबदला देवून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून भूसंपादन करावे. हिंजवडी एलिव्हेटेड मार्गाचे काम सहा पदरी करून याबाबत १५ दिवसात निर्णय घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

रस्ता रूंदीकरणाच्या कामांना प्राधान्य द्यावे

सूर्या हॉस्पिटल ते माण गावठाणम्हाळुंग ते हिंजवडी फेज एकशनि मंदिर वाकड ते मरूनजीनांदे ते माण या रस्त्यांच्या रूंदीकरणाच्या कामाला संबंधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. शिवाजीनगर ते हिंजवडी कॉरिडॉरचा आराखडा तयार करावा. वाकड-बालेवाडी भागात सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारावेयामुळे प्रवासी विभागले जावून गर्दी नियंत्रणात राहील. रस्त्यावरील गर्दी रोखता येईल. यासाठी फूटपाथचा विषयी दोन्ही ‘मनपा’ने प्राधान्याने मार्गी लावावा. पाटीलवस्ती ते बालेवाडीरोड येथील भूसंपादनाबाबत महिनाभरात काम करावेअसे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य प्रवाहासाठी नियोजन करावे. त्याठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे हाती घ्यावी. सर्व कामांसाठी विभागीय आयुक्त यांनी समन्वय करून बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

Related Articles

क्रीडा युवक कल्याण विभागामार्फत ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन

झुंजार सेनापती l मुंबई शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियानाला’ गती देणार

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियानाला’ राज्यभर गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!