spot_img
spot_img

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई विमानतळ, मेट्रो लाईन-३ आणि ‘मुंबई वन’ अॅपचा लोकार्पण सोहळा

झुंजार सेनापती l मुंबई

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनमुंबई मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे राष्ट्राला समर्पण आणि मुंबई वन’ या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचे लोकार्पण होणार आहे. त्याशिवायराज्यातील ४१९ आयटीआय आणि १४१ तांत्रिक संस्थांमध्ये २,५०६ बॅचेसच्या माध्यमातून नवीन अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम या उपक्रमाची सुरुवात प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

नवी मुंबई विमानतळाजवळील प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडूकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढालोकसभा सदस्य श्रीरंग बारणे यांच्यासह लोकप्रतिनिधी  विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात नवे युग सुरू करणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प ठरणार आहे. सिडको  प्राधिकरण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या माध्यमातून हा विमानतळ सार्वजनिक-खागी भागीदारी (PPP) अंतर्गत उभारण्यात आला आहे. या विमानतळाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री मोदी हे विमानतळावरील सोयी सुविधांची पाहणी करणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात ₹१९,६४७ कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून,१६० हेक्टर क्षेत्रावर उभारलेला हा विमानतळ दरवर्षी २० दशलक्ष प्रवासी व ०.५ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळू शकतो. अंतिम टप्प्यात हे विमानतळ ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२५ दशलक्ष टन मालवाहतूक क्षमतेचे जागतिक दर्जाचे केंद्र बनेल.

दोन समांतर कोड-एफ रनवेजलद बाहेर पडण्यासाठी टॅक्सीवेअत्याधुनिक मालवाहतूक  टर्मिनलसौरऊर्जेवर आधारित ४७ मेगावॅटचा ऊर्जेचा पुरवठा आणि इलेक्ट्रिक बस सेवा ही या विमानतळाची वैशिष्ट्ये आहेत. तसेचहा देशातील पहिला वॉटर टॅक्सीने जोडलेला विमानतळ असणार आहे.

या विमानतळावरुन डिसेंबर २०२५ मध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार असूननवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या आधुनिकहरित आणि जागतिक दर्जाच्या विमान वाहतूक पायाभूत सुविधेचे प्रतिक ठरणार आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!