spot_img
spot_img

सेल्फी काढण्यासाठी गाडी थांबवली तर थेट कारवाई; एमएसआरडीसीचा इशारा

झुंजार सेनापती l प्रतिनिधी  l  मुंबई  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांनी वाहनधारकांना कडक इशारा देत म्हटले आहे की, यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) परिसरात सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी वाहने थांबवू नयेत.
लोकार्पणानंतर या मार्गावर काही वाहनचालक केबल-स्टेड पुल आणि बोगद्याजवळ गाड्या उभ्या करून फोटो काढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहन थांबवणे नियमबाह्य असून त्यामुळे मोठ्या अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले.
महामार्ग पोलिसांनी या मार्गासाठी वेगमर्यादा निश्चित केली असून बोगद्यामध्ये हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किमी, तर बस व इतर प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे.
या कनेक्टिंग लिंकवरील दोन बोगदे आणि दोन पुलांवर अत्याधुनिक २४x७ सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असून स्वतंत्र नियंत्रण कक्षातून सतत देखरेख ठेवली जात आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनांची माहिती तात्काळ महामार्ग पोलिसांना दिली जाणार आहे.
सेल्फी, फोटो किंवा रिल बनवण्यासाठी थांबणाऱ्या वाहनधारकांवर मोठ्या दंडाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे.

Related Articles

विठुरायाच्या दर्शनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 'पंढरपूर कॉरिडॉर' प्रकल्पाची...

विठुरायाच्या दर्शनासाठी आधुनिक सुविधा; पंढरपूर कॉरिडॉर उभारणार

⬤ झुंजार सेनापती l पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!