spot_img
spot_img

मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीची बातमी खोटी; महिला आयोगाबाबत अफवा पसरवू नका

झुंजार सेनापती l प्रतिनिधी l मुंबई : ‘मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड’ अशा आशयाची बातमी सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिकृत माहितीनुसार, मीरा बोरवणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणतीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे या संदर्भातील सर्व बातम्या निराधार असून नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक माध्यमांवर वेगाने पसरत असलेल्या अशा अफवांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अफवांपासून दूर राहावे आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.

Related Articles

अशा नराधमांना रस्त्यावर शिक्षा द्या!

झुंजार सेनापती l मुंबई  भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने राज्य हादरले आहे. या अमानुष घटनेवर मनसे...

सेल्फी काढण्यासाठी गाडी थांबवली तर थेट कारवाई; एमएसआरडीसीचा इशारा

झुंजार सेनापती l प्रतिनिधी  l  मुंबई  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांनी वाहनधारकांना कडक इशारा देत म्हटले आहे की, यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!