spot_img
spot_img

सुरक्षारक्षकाचा घाणेरडा प्रकार; चार मुलींना टेरेसवर नेऊन अत्याचाराचा प्रयत्न

झुंजार सेनापती l  पिंपरी-चिंचवड
पुण्यातील नसरापूर आणि पर्वती परिसरातील धक्कादायक घटनांची चर्चा सुरू असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातून पुन्हा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरक्षारक्षकानेच चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या दिनेश नावाच्या सुरक्षारक्षकाने शुक्रवारी दुपारी १०, ८, ६ आणि ८ वर्षे वयोगटातील चार चिमुरड्यांना “टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो” असे आमिष दाखवत सातव्या मजल्यावर नेले. तिथे त्याने मुलींशी अश्लील वर्तन करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही त्याने दिल्याचे समोर आले आहे.
या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. मात्र, त्यातील एका १० वर्षांच्या मुलीने मोठे धैर्य दाखवत घरी पोहोचताच आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर संतप्त पालकांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे.
या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात संतापाची लाट उसळली असून, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ज्या व्यक्तीवर सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते, त्याच व्यक्तीकडून अशा प्रकारची घृणास्पद कृती घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!