spot_img
spot_img

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

झुंजार सेनापती l सातारा 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीत ते संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर काही काळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. मात्र साताऱ्यातील कार्यक्रमातून त्यांनी पुन्हा सक्रिय सामाजिक व राजकीय कामकाजाला सुरुवात केली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीसाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याने शरद पवार यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

विठुरायाच्या दर्शनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 'पंढरपूर कॉरिडॉर' प्रकल्पाची...

विठुरायाच्या दर्शनासाठी आधुनिक सुविधा; पंढरपूर कॉरिडॉर उभारणार

⬤ झुंजार सेनापती l पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!