spot_img
spot_img

युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन!

पेट्रोल-डिझेल गॅस जपून वापरा

झुंजार सेनापती l हैदराबाद
इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात आर्थिक तणाव वाढत असून त्याचा परिणाम इंधन दरांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे.
मोठ्या शहरांमध्ये खासगी वाहनांऐवजी मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे . कार्यालयीन कामकाजासाठी पुन्हा ‘वर्क फ्रॉम होम’सारख्या पर्यायांवर भर देण्याचे आवाहन ही केले आहे .
जागतिक परिस्थिती अस्थिर असल्याने अनावश्यक परदेश प्रवास पुढे ढकलावा, तसेच सोने खरेदी करताना सावधगिरी बाळगावी, असेही पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी संयम ठेवावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ही मोदी यांनी या वेळी केले आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!