⬤ झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत वैयक्तिक तसेच सार्वजनिक व सामुदायिक जमिनीवर चारा लागवडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी योजनेत सात अतिरिक्त चारा पिकांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी मंत्रालयात दिली.
२०२६ मधील पावसातील तूट, पावसाचे असमान वितरण, खरीप उत्पादनातील घट आणि रब्बी पेरणी क्षेत्रात संभाव्य घट यामुळे पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन चारा उत्पादन वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


