spot_img

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आधार व स्वयंम योजनांचे नूतनीकरण सुरू!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यातील ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ आणि ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ यांचा लाभ घेणाऱ्या विद्यमान विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश नूतनीकरणाचे ऑफलाइन अर्ज २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर आणि उपनगर कार्यालयाने केले आहे इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या; मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबविण्यात येते. तसेच भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ राबविण्यात येते.मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये या योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नूतनीकरण प्रक्रियेची माहिती देण्याचे आणि महाविद्यालयाच्या सूचना फलकावर त्याबाबत सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही पात्र विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.विद्यार्थ्यांनी ऑफलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रांची एक प्रत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर, उपनगर नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७१ येथे जमा करावी, असे आवाहन सहायक संचालक रविकिरण मलकूनाईक, मयूरी कदम यांनी केले आहे.

Related Articles

पशुधनासाठी चारा लागवडीला शासनाचे प्रोत्साहन; सात नवीन चारा पिकांचा योजनेत समावेश!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत वैयक्तिक तसेच...

वाहन नोंदणीपूर्वीच ग्राहकाच्या ताब्यात; नवनीत मोटर्सवर परिवहन विभागाची कारवाई!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई परिवहन विभागाच्या चौकशीत मे. नवनीत मोटर्सने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी एमएच ०१ एफएम २२११ क्रमांकाचे वाहन नोंदणी होण्यापूर्वीच ग्राहकाच्या ताब्यात...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!