नुकतेच काही महिन्यांपूर्वी ॲपलने आपली बहुचर्चित iPhone 16 सिरीज लाँच केली. भारतासह अनेक देशात आयफोनचे चाहते आहेत. iPhone 16 लाँच होताच युजर्सने याला उत्तम प्रतिसाद दर्शवला. त्यातच आता आयफोन 16 बाबत एक नवीन बातमी समोर आली आहे.
यानुसार या स्मार्टफोनला आता एका देशात चक्क बॅन करण्यात आले आहे. असे का झाले? आणि हा देश नक्की कोणता आहे? याविषयी काही सविस्तर बाबी जाणून घेऊयात.
ॲपल iPhone 16 सिरीज नुकतीच बाजारात दाखल झाली. मात्र , एक देश आहे ज्याने यावर बंदी घातली आहे. तसेच, त्या देशात सध्या असलेला iPhone 16 बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. इंडोनेशियाने iPhone 16 ची विक्री तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, हा निर्णय ॲपलवर होणाऱ्या कठोर कारवाईचा एक भाग आहे. ॲपलने आपल्या देशात गुंतवणूक करण्यास सांगितले होते, असा आरोप इंडोनेशियन सरकारने केला आहे. परंतु कंपनी तसे करण्यास असमर्थ असल्याचे सिद्ध झाले आहे.