सीएनजीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कार्सकडे पाहिले जात आहे. अनेक ग्राहक इंधनाच्या वाढत्या किंमतींना कंटाळून इलेक्ट्रिक कार्सच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे.
अनेक कंपनीज सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादकडे विशेष लक्ष देत आहे. याचे कारण म्हणजे येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनेच ऑटोमोबाईल क्षेत्रावर राज्य करणार आहेत.
देशात अनेक कंपनीज आहे ज्या उत्तमोत्तम कार्स मार्केटमध्ये आणत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे ह्युंदाई. ह्युंदाईने देशात अनेक कार्स लाँच एल्यात आहेत, जटिल काही लोकप्रिय सुद्धा ठरल्या आहेत. आता कंपनी आपली इलेक्ट्रिक कार सुद्धा मार्केटमध्ये आणण्यास सज्ज आहे.
Hyundai आपली नवीन इलेक्ट्रिक कार आणणार आहे, जी 3-रो इलेक्ट्रिक SUV असणार आहे. कंपनीने एक टीझरही रिलीज केला आहे. ज्यामध्ये ही 3-रो इलेक्ट्रिक SUV नोव्हेंबरमध्ये लाँच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक SUV चे नाव Hyundai Ioniq 9 असणार आहे. बरेच दिवस लोकं याची वाट पाहत होते. या कारचे डिझाइन कसे असेल, त्यात कोणते उत्कृष्ट फीचर्स असतील याबद्दल जाणून घेऊया.
Hyundai ची ही पहिली 3-रो इलेक्ट्रिक SUV असणार आहे. याच्या टीझरमध्ये पाहण्यासारखे फार काही नाही आहे, फक्त या कारची साइझ प्रोफाइल समोर आली आहे.