spot_img
21.6 C
New York
Wednesday, October 8, 2025

Buy now

spot_img

ठाण्यात १९ नोव्हेंबरपासून आठ दिवसांचा  ‘कोकण महोत्सव’    

मुंबई : झुंजार सेनापती 

ठाणे :  राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे साहेब  यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकरनगर विद्यमाने यंदा १९ ते २६ नोव्हेंबर दरम्यान भव्य स्वरूपाच्या कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मा. शिवसेना गटनेते व मा. नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेल्या या कोकण महोत्सवाचे यंदा १६ वे वर्ष असून विविध प्रकारचे १६ कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे.

सावरकरनगर येथील ठा म पा शाळा क्रमांक १२० च्या मैदानात दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात ५ पारंपरिक दशावतार नाटके, कोकण काव्योत्सव, आदिवासी नृत्य, कोकणरत्न पुरस्कार, खेळ पैठणीचा, वेशभूषा स्पर्धा, पाककला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, मुलांसाठी फनफेअर, खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल्स असतील.

झणझणीत म्हावरा, अस्सल चवीचो मालवणी मसालो, खडखडे लाडू, मालवणी खाजा, कुळदाची पिठी, सुकी मच्छी, मासे, कोकम, कोकणातील पर्यटन, काजू, आंबा अशा  विविध प्रकारच्या स्टॉलचा समावेश आणि सेलिब्रिटिंची विशेष उपस्थिती असणार आहे.विशेष आकर्षण असणाऱ्या श्री क्षेत्र भरणे खेड येथील श्री काळकाई देवी मंदिराची प्रतिकृती महोत्सव स्थळी साकारण्यात आली आहे.

 या महोत्सवात सुमारे दीड ते दोन लाख नागरिक, कोकणप्रेमी, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रांत कार्यरत असणारे, कलाकार भेट देणार आहेत.

 १९नोव्हेंबर रोजी या कोकण  महोत्सवाला प्रारंभ होईल. यावेळी श्री कलेश्वर नाट्यमंडळ दशावतार, २० नोव्हेंबर आदिवासी तारफा नृत्य आणि पारंपरिक नृत्याचा नजराणा, सेलिब्रिटी गौरी पवार, २१ नोव्हेंबर वेशभूषा स्पर्धा, जय हनुमान पारंपरिक दशावतार, २२ नोव्हेंबर पाककला  स्पर्धा , शासनाच्या  विविध योजनांची माहिती, जितू दादा प्रस्तुत पैठणी कार्यक्रम, सेलिब्रिटी  रंजीता पाटील, २३ नोव्हेंबर रोजी एव्हीए हा आगळा वेगळा फॅशन शो, बिग बॉस फेम डॉ रोहित शिंदे, चेंदवणकर पारंपरिक नाट्य मंडळ दशावतार, २४ नोव्हेंबरला कोकण-काव्योत्सव, कलेश्वर पारंपरिक नाट्यमंडळ दशावतार, २५ नोव्हेंबर सोलो व ग्रुप नृत्य स्पर्धा श्री आशिमिक महाराष्ट्र लावणी सम्राट विजया शिंदे, २६ नोव्हेंबर कोकण रत्न पुरस्कारांचे वितरण, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, किल्ले पुरस्कार, अमृतनाथ नाट्यमंडळ दशावतार… असे भरगच्च कार्यक्रम होतील.या ‘महोत्सवाक यवकच होया,’ असे आवाहन आयोजक दिलीप बारटक्के यांनी केले आहे.

Related Articles

ब्रिटन चे प्रधानमंत्री सर किर स्टार्मर यांचे मुंबईत आगमन

झुंजार सेनापती l मुंबई ब्रिटन चे प्रधानमंत्री सर किर स्टार्मर  यांचे त्यांच्या शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!