spot_img
spot_img

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानातील अंतिम आकडेवारी जाहीर

झुंजार सेनापती lप्रतिनिधीl मुंबई 

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 288 मतदारसंघांकरिता दिनांक 20 नोव्हेंबर 2024 

रोजी मतदान झालेया मतदानात एकूण 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण 3 कोटी 34 लाख 37 हजार 57 पुरूष, 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिला तर 1 हजार 820 इतर मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.          या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम 

आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित झाली आहे. यात प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचासमावेश आहेप्रत्यक्ष मतमोजणी करतांना टपाली मतदानाचा समावेश करण्यात येईलत्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाद्यारे भरण्यात आलेला 17 सी हा प्रत्यक्ष झालेल्या मतदानासंदर्भातील फॉर्म 

उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही देण्यात आला असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

Related Articles

जनादेश, विचारधारा आणि सत्तेची भूक

⬤ झुंजार सेनापती l प्रतिनिधी  महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे भाजप-शिवसेना युतीला बहुमताचा कौल दिला होता. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र लढत जनतेकडे मतांची...

बेस्ट वाचवण्यासाठी कामगारांचा एल्गार; शुक्रवारपासून बेमुदत संपाचा इशारा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या कथित खासगीकरणाविरोधात आणि अदानी समूहाला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांविरोधात बेस्ट कामगारांनी संघर्षाची भूमिका घेतली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!