spot_img
4.7 C
New York
Sunday, November 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती;

29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना 29 एप्रिल 2025 पासून 19 मे 2025 पर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे देण्यात आली आहे.

 राज्य शासनाच्या कृषिपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागणीवरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारीमहाराष्ट्र पशुसंवर्धन सेवागट-अ या संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पदांचा तपशील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करताना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

Related Articles

नागरिकांनो सतर्क राहून देशाच्या सुरक्षेचे कान आणि डोळे व्हा…

झुंजार सेनापती l मुंबई दहशतवादाविरुद्धचे युद्ध संपलेले नाही. या दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग आणि सतर्क असले पाहिजे. कान आणि डोळे बनून सुरक्षेचे...

क्रीडा युवक कल्याण विभागामार्फत ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन

झुंजार सेनापती l मुंबई शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!