spot_img
7.3 C
New York
Friday, November 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

राज्यात अत्याधुनिक सुविधांसह क्रीडा संकुले उभारणार

- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

 राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी अत्याधुनिक सुविधांसह तालुका व जिल्हा क्रीडा संकुले उभारणीची कामे करावीत, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे राज्य क्रीडा विकास समितीची बैठक झाली. यावेळी राज्याच्या क्रीडा धोरणांतर्गतक्रीडा योजनांमध्ये सुधारणा करणेनवीन धोरणांमध्ये अभिप्रेत असलेल्या योजनांना मान्यता देणेविभागाच्या क्रीडा सुविधा हाती घेणे तसेच क्रीडा योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी क्रीडा विभागाचे प्रभारी आयुक्त सुधीर मोरे, उपसचिव सुनील पांढरे यांच्यासह महसूल, वित्त, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कीराज्यात ३८० तालुक्यात ४२५ क्रीडा संकुलास मान्यता असूनपूर्ण झालेल्या १६२ क्रीडा संकुलात जास्तीत जास्त खेळाडूंना सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न करावेत. उर्वरित क्रीडा संकुलाची कामे जलदगतीने पूर्ण करून खेळाडूंसाठी ती उपलब्ध करून द्यावीत.

याचबरोबर मुंबई शहरउपनगरधारावीकळवाठाणे येथील क्रीडा संकुलाच्या नूतनीकरण व उभारणीसंदर्भात जलदगतीने कार्यवाही करावी. कराडकल्याणअंबरनाथचंद्रपूर येथील क्रीडा संकुलाच्या उभारणीबाबत तसेच १२८ तालुक्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या १५० क्रीडा संकुलांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिले.

०००

Related Articles

क्रीडा युवक कल्याण विभागामार्फत ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन

झुंजार सेनापती l मुंबई शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियानाला’ गती देणार

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियानाला’ राज्यभर गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!