spot_img
spot_img

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

झुंजार सेनापती l मुंबई

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता बीजभांडवल योजनाथेट कर्ज योजना व अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा व्यवस्थापक वैशाली मुडळे यांनी केले आहे.

मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील वय १८ वर्षापेक्षा जास्त असलेल्या आणि वय ५० पेक्षा कमी असलेल्या अर्जदारांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता बँकेकडून मंजूर होणाऱ्या अनुदान योजनेंतर्गत उपनगर ५० व शहर ५० चे उद्दिष्ट (५० हजार रुपये पर्यंतचे)बीजभांडवल योजनेअंतर्गत उपनगर ५० व शहर ५० चे उद्दिष्ट (५०,००१ ते ७.०० लाख रुपये पर्यंत) व थेट कर्ज योजनेतंर्गत उपनगर ५० व शहर ५० उद्दिष्ट (१ लाख पर्यंतचे)मुंबई शहर-उपनगर जिल्हा करिता प्राप्त आहे.

इच्छुक अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेविकास महामंडळ (मर्या)जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगरगृहनिर्माणभवनकलानगरतळमजलारुम नं. ३३बांद्रा (पू)मुंबई – ४०० ०५१ या पत्त्यावर किंवा ०२२-३५४२४३९५ या दूरध्वनीवर संपर्क साधावाअसे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


 

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!