spot_img
18.8 C
New York
Thursday, October 9, 2025

Buy now

spot_img

मागास घटक विकासासाठी 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

रस्ते, मेट्रो, सिंचनासारख्या  पायाभूत प्रकल्पांची निर्मिती

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

विधीमंडळाच्या जून 2025 च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्तेमेट्रोसिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठीसिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणीमहात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनासंजय गांधी निराधार अनुदान योजनामागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच दुर्बलवंचित समाजघटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांपैकी 19 हजार 183 कोटी 85 लाख रुपये अनिवार्य तर 34 हजार 661 कोटी 34 लाख रुपये कार्यक्रमांतर्गत आणि 3 हजार 664 कोटी 52 लाख रुपये केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत. स्थूल पुरवणी मागण्या 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 40 हजार  644 कोटी 69 लाख रुपयांचा आहे.

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक 11 हजार 42 कोटी 76 लाख रुपये हे पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदानांसाठी खर्च होणार आहेत. 3 हजार 228 कोटी 38 लाख रुपये हे मेट्रो प्रकल्पमहापालिकानगरपालिकानगरपरिषदाजिल्हा परिषदा यांच्या मुद्रांक शुल्क अधिभार परताव्यापोटीचे आहेत. राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोनसाठी 2 हजार 182 कोटी 69 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Related Articles

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विकासाचे नवे इंजिन

झुंजार सेनापती l मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाही, तर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचे नवे इंजिन ठरणार आहे. राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात...

महिला व मुलींच्या आरोग्यसुरक्षेसाठी सेवाभावी संस्थांनी पुढे यावे

झुंजार सेनापती l मुंबई मराठवाड्यासह राज्यातील काही भागांमध्ये परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत महिलांच्या आरोग्याच्या गरजांचा विचार करून पूरग्रस्त महिलांसाठी वैयक्तिक स्तरावर पाच लाख...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!