झुंजार सेनापती l नवी मुंबई
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टच स्क्रीन द्वारे डिजिटल तोरणाने करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टर्मिनल इमारतीमधील सुविधांसह विमानतळाच्या त्रिमितीय रचनेची पाहणी केली.
यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.