spot_img
15 C
New York
Saturday, October 11, 2025

Buy now

spot_img

महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा

क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम क्रीडांगणांवर मिळणार सुविधा

झुंजार सेनापती l मुंबई

राज्यातील महिला खेळाडूंसाठी शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र, स्वच्छ आणि सुरक्षा-सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा महिला खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी काही दिवसांपूर्वी दादर जिमखानाच्या नूतनीकरण उदघाटनप्रसंगी महिलांना क्रीडांगणावर सुरक्षित व आदरयुक्त वातावरण मिळालेच पाहिजे, त्यासाठी देशभरातील क्रीडा संकुलात महिलांना चेंजिंग रुमची सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल आवाहन केले होते.

या आवाहनाला तत्काळ व सकारात्मक प्रतिसाद देणारे क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे हे देशातील पहिले मंत्री ठरले आहेत.

क्रीडा मंत्री ॲड.कोकाटे यांनी सांगितले की, राज्यभरातील महिला खेळाडूंना सुरक्षित आणि सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना तातडीने राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्हा, तालुका आणि स्थानिक क्रीडांगणावर या सुविधा प्राधान्याने उभारल्या जातील.

चेंजिंग रूममध्ये स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा आणि आवश्यक सुरक्षिततेसाठी मर्यादित क्षेत्रात सीसीटीव्ही देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी महिला सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुनी इमारती दुरुस्त करणे अथवा नवीन चेंजिंग रूम बांधण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री श्री. कोकाटे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे केवळ सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तर महिलांचा सहभाग आणि विश्वास क्रीडा क्षेत्रात वाढीस लागेल.

क्रीडा मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक मुलगी आता अभिमानाने मैदानात उतरेल. तिच्या प्रत्येक यशामागे सुरक्षित आणि सन्मानित वातावरणाचा मजबूत पाया असेल. या निर्णयामुळे राज्यातील महिला खेळाडूंसाठी एक नवा अध्याय सुरू होणार असून, महाराष्ट्र महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक पुढचा टप्पा पार करत आहे.

Related Articles

ओला-उबर,रॅपिडोसह सर्व ॲप आधारित सेवांसाठी नवे मानक ठरवले जाणार!

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५” या मसुदा नियमांची घोषणा...

महावितरणकडून राज्यातील वीजपुरवठा सुरळीत

झुंजार सेनापती l मुंबई वीज कर्मचाऱ्यांच्या २९ पैकी सात संघटनांच्या संयुक्त कृती समितीने गुरुवार (दि. ९) पासून सुरू केलेल्या ७२ तासांच्या बेकायदेशीर संपाच्या कालावधीत महावितरणकडून राज्यभरातील...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!