spot_img
12.3 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

spot_img

राज्यात 15 ऑक्टोबर पासून वादळी पावसाचा अंदाज

शेतकऱ्यांनो काढणी केलेले पिक सुरक्षित ठेवा

झुंजार सेनापती l मुंबई

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान 18 ऑक्टोबर पर्यंत विदर्भमराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे.

सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकतंजिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावेअसे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

मुंबईतील फुटबॉलपटूंना सुवर्णसंधी!

झुंजार सेनापती l मुंबई महाराष्ट्र संस्था फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), सिडको (CIDCO) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार  क्रीडा...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी मदत

झुंजार सेनापती l मुंबई यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!