झुंजार सेनापती l मुंबई
टिळक भवनात आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडीची घोषणा केली.
काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष युतीनिमित्त महादेव जानकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी एकमेकांना पेढे भरवून गळाभेट घेतली आणि युती ची अधिकृत घोषणा केली. या युती बाबत विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. “सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड करणारी ही युती असून जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका नाही,” असा आरोप विरोधकांनी केला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले फोटोसेशन असल्याची टीका करताना, युतीमुळे राज्यातील राजकीय गोंधळ वाढेल, असा दावा विरोधकांनी केला आहे.



