झुंजार सेनापती l सातारा
राज्यातील शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा सक्तीची नसेल, ती ऐच्छिक स्वरूपातच राहील, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इतर भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू कराव्यात, याबाबतचा निर्णय डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घेतला जाईल. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून महाराष्ट्राचा आत्मा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भाषाविषयक धोरण स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, मराठी भाषेची सक्ती कायम राहील; मात्र इतर कोणत्याही भारतीय भाषेची सक्ती केली जाणार नाही. या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर पुढील निर्णय जाहीर केला जाईल.
यावेळी संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. मृदुला गर्ग, स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्षा डॉ. ताराबाई भवाळकर, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नगराध्यक्ष अमोल मोहिते, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, उद्योजक फरोख कूपर, जिल्हाधिकारी संतोष



