spot_img
spot_img

बारामतीत अजित पवार स्मृती संग्रहालय उभारणार

झुंजार सेनापती l बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आठवणी जतन करण्यासाठी बारामतीत स्मृती संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराचे स्थळ असलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणातच हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
या संग्रहालयात गेल्या तीन दशकांत अजित पवार यांनी जपून ठेवलेल्या आणि वापरलेल्या वैयक्तिक वस्तूंचा संग्रह पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये विविध घड्याळे, गॉगल, कपडे, चपला आदी वस्तूंचा समावेश असेल. तसेच संग्रहालयाच्या परिसरात त्यांचा कायमस्वरूपी ब्राँझ पुतळाही उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विमान अपघातानंतर त्यांच्या सोबत असलेल्या काही वैयक्तिक वस्तू कुटुंबियांना मिळाल्या असून त्यात घड्याळ, चष्मा, चष्म्याची केस, चप्पल, बुटांचा जोड तसेच अपघातात जळालेले कपडे यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूही संग्रहालयात जतन करून प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
संग्रहालयात अजित पवार यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाचा आढावा घेणारी माहिती, छायाचित्रे आणि दस्तऐवज मांडले जाणार आहेत. त्यांच्या जीवनकार्यावर आधारित एक विशेष चित्रफीतही तयार करण्यात येत असून, भविष्यात हे संग्रहालय बारामतीतील एक महत्त्वाचे स्मृतिस्थळ ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!