spot_img
spot_img

एसटी कर्मचारी संघटना पुन्हा आक्रमक

राज्य ठप्प करण्याचा सरकारला इशारा

झुंजार सेनापती l मुंबई 

वेतनवाढीचा फरक आणि थकीत मासिक भत्त्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचारी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या असून त्यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. १० फेब्रुवारीपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी संप छेडत एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठे संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत.
संघटनांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यास राज्यभर ‘चक्का जाम’ करण्यात येईल. यासाठी सरकारला तीन दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत झाल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने आता थेट संघर्षाचा मार्ग स्वीकारल्याचा इशाराच कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
संभाव्य संपामुळे लाखो प्रवाशांचे हाल होण्याची भीती व्यक्त होत आहे. संघटनांनी प्रवाशांना पर्यायी नियोजन करण्याचे आवाहन केले असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. चार वर्षांपूर्वीच्या दीर्घ एसटी संपाची आठवण अजून ताजी असताना पुन्हा एकदा राज्य वाहतूक यंत्रणा ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. आता सरकार काय भूमिका घेते, यावर पुढील संघर्षाची दिशा ठरणार आहे.

Related Articles

अमृत’च्या माध्यमातून ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायाला चालना

झुंजार सेनापती l मुंबई, दि. १ : हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),...

Kako tiki taka casino promo code môže zmeniť váš herný zážitok

V tomto článku sa pozrieme na to, ako môže tiki-takacasino.sk promo kód zmeniť váš herný zážitok. Zameriame sa na výhody, ktoré ponúka, ako ho...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!