spot_img
spot_img

मंत्री जयकुमार गोरे बिनशर्त माफी मागा!

खा.प्रणिती शिंदेंची कायदेशीर नोटीस

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत सात दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागण्याची मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
९ मे रोजी सोलापूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली होती. “त्या सोलापूरमधील रस्त्यांचा विचार करत नाहीत, तर दिल्लीतील राहुल गांधी यांच्या घरासमोरील रस्त्यांचा विचार करतात,” असे विधान त्यांनी केले होते. या वक्तव्यामुळे सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसल्याचा दावा शिंदे यांच्या वतीने करण्यात आला आहे.
या प्रकरणी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने अॅड. असीम सरोदे, अॅड. श्रिया आवले आणि अॅड. आर्या राजेभोसले यांनी नोटीस पाठवली आहे. मोहोळ–वळसंग रस्त्याच्या कामाच्या श्रेयवादावरून सुरू असलेल्या वादातून ही टिप्पणी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
नोटीसमध्ये जयकुमार गोरे यांनी यापूर्वी केलेल्या काही विधानांचाही उल्लेख करण्यात आला असून, नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांत माफी न मागितल्यास न्यायालयीन कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

‘तिसऱ्या मुंबई’त १५ लाख रोजगारांचे लक्ष्य!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई रायगड-अलिबाग, दि. २५ : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात...

दुष्काळग्रस्त भागात पोषण व आरोग्याच्या काळजीसाठी महिला व बालविकास विभाग सक्रिय

⬤ झुंजार सेनापती l मुंबई निसर्गातील बदल, वाढते तापमान आणि पावसाचा अभाव यामुळे राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा परिणाम केवळ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!