spot_img
spot_img

सरकारी परिचारिकांचा सरकारविरोधात रणसंग्राम; १८ मेपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन

झुंजार सेनापती l मुंबई

प्रलंबित मागण्या आणि राज्य सरकारच्या जिल्हास्तरीय बदली धोरणाविरोधात राज्यातील सरकारी रुग्णालयांतील सुमारे ३० हजार परिचारिका १८ मेपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन छेडणार आहेत. १८ ते २० मेदरम्यान हे आंदोलन करण्यात येणार असून राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या या आंदोलनात रिक्त पदे तातडीने भरणे, कंत्राटी पदभरती रद्द करणे, विविध भत्त्यांमध्ये वाढ करणे, पदोन्नती प्रक्रिया गतीमान करणे तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षितता उपलब्ध करून देणे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, २०१९ पासून परिचारिका संप, निदर्शने आणि निवेदनांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र अनेक बैठका आणि चर्चांनंतरही सरकारकडून केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

दरम्यान, जिल्हास्तरीय बदली धोरणामुळे परिचारिकांसमोर गंभीर कौटुंबिक आणि आर्थिक अडचणी निर्माण होणार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. परजिल्ह्यात बदली झाल्यास मुलांचे शिक्षण, कुटुंबाची जबाबदारी आणि रोजच्या प्रवासाचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याने हे धोरण तातडीने रद्द करावे, अशी मागणी परिचारिकांनी केली आहे.

Related Articles

“गुगल”ला उच्च न्यायालयाची नोटीस!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मोबाईल  अॅपद्वारे कथित अश्लील आणि बेकायदेशीर मजकुराचा प्रसार होत असल्याच्या आरोपांवरून आणि यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. नागरिक...

बेकायदा खडी क्रेशर परवानग्यांचे प्रकरण कलेक्टर पाठकांच्या अंगलट येणार ?

⬤ झुंजार सेनापती l मुंबई तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना एसआयटीने अटक केल्यानंतर आता त्यांच्या कार्यकाळातील विविध निर्णयांची चौकशी अधिक वेगाने सुरू झाली आहे. सध्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!