spot_img

जलयुक्त शिवार ३.० मधून १८ हजार गावे जलसमृद्ध करणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून ग्रामीण भाग जलसमृद्ध करण्यासाठी जलयुक्त शिवार ३.० अभियानाच्या माध्यमातून राज्यातील १८ हजार गावांना जलसमृद्ध करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येणार आहे. जलसंधारणाची कामे केवळ शासकीय योजना न राहता लोकसहभागातून लोकचळवळ म्हणून उभी राहिली पाहिजेत, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.

कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेच्या पंपगृह कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या योजनेमुळे कर्जत तालुक्यातील १९ गावांमधील ५९९ हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. योजनेसाठी ६६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, २७ तलावांमध्ये पाणी उपलब्ध होणार आहे.
जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शेती’, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जलतारा प्रकल्प, नाला रुंदीकरण व खोलीकरण, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि पावसाचे पाणी साठविण्याच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची कामे राज्यातील १ हजार ५२० गावांमध्ये सुरू असल्याची माहिती मंत्री राठोड यांनी दिली.
जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढविणे, भूजलपातळी सुधारणा आणि शेतीला शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे यावर शासनाचा भर आहे. या उपक्रमांमध्ये ग्रामस्थ, शेतकरी आणि स्थानिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

एमएसएमई उद्योजकांसाठी शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई माहिती हे सक्षमीकरणाचे प्रभावी साधन असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सूक्ष्म, लघु...

महाराष्ट्रात एअर ॲम्ब्युलन्ससह नवीन रुग्णवाहिका सेवांसाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित होणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई महाराष्ट्र राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स व नवीन ॲम्ब्युलन्स सेवांचे संचालन अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!