spot_img
11.3 C
New York
Friday, November 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

सॅमसंगची स्मार्ट रिंग भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सॅमसंगने अखेर आपली पहिली स्मार्ट रिंग Samsung Galaxy Ring भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. स्लीक टायटॅनियम डिझाइन असलेली स्मार्ट रिंग सॅमसंगने लॉन्च केली आहे.

कंपनीने या लॉन्चची माहिती आधीच दिली होती आणि मागील 6 दिवसांपासून प्री-बुकिंग देखील सुरू झाले होते. सॅमसंगने या रिंगमध्ये अनेक दमदार फीचर्स दिले आहेत.

तुम्हाला Samsung Galaxy Ring घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एकूण 38,999 रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये तुम्हाला टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम सिल्व्हर आणि टायटॅनियम गोल्ड असे तीन प्रकारचे कलर ऑप्शन्स मिळतात. ही स्मार्ट रिंग 5-13 ते 9 आकारात उपलब्ध आहे. आता ही स्मार्ट रिंग सर्व ग्राहकांसाठी सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी रिंग स्लीक टायटॅनियम फिनिश डिझाइनसह येते. त्याची टायटॅनियम फ्रेम खूपच आकर्षक आहे जी दैनंदिन कामात वेगळा लुक देते. रिंगमधील बॅटरीची लेव्हल पाहण्यासाठी बटणाभोवती एलईडी लाइट देण्यात आला आहे. तुम्ही ही स्मार्ट रिंग वायरलेस पद्धतीनेही चार्ज करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी या सॅमसंग गॅलेक्सी रिंगमध्ये ब्लूटूथ v5.4 व्हर्जन देण्यात आले आहे. तसेच यामध्ये तुम्हाला 8Mb स्टोरेज मिळेल.

Related Articles

क्रीडा युवक कल्याण विभागामार्फत ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन

झुंजार सेनापती l मुंबई शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियानाला’ गती देणार

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियानाला’ राज्यभर गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!