झुंजार सेनापती l मुंबई
नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत नागरिकांना पारदर्शक व जलद सेवा देण्यात येत असून, विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक व अन्य प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. विभागाच्या अधिकारी-कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. पदोन्नती व रिक्त पद भरतीची प्रक्रिया गतीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. सेवाप्रवेश नियम, पदनाम बदल, प्रशिक्षण तसेच खासगी जागेतील कार्यालये शासकीय जागेत स्थलांतरित करण्याबाबत जिल्हानिहाय अहवाल तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या



