spot_img
spot_img

नोंदणी व मुद्रांक कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार

– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

झुंजार सेनापती l मुंबई
नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत नागरिकांना पारदर्शक व जलद सेवा देण्यात येत असून, विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक व अन्य प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. विभागाच्या अधिकारी-कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. पदोन्नती व रिक्त पद भरतीची प्रक्रिया गतीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. सेवाप्रवेश नियम, पदनाम बदल, प्रशिक्षण तसेच खासगी जागेतील कार्यालये शासकीय जागेत स्थलांतरित करण्याबाबत जिल्हानिहाय अहवाल तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या

Related Articles

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर एक लाखांहून अधिक हरकती

⬤ झुंजार सेनापती l मुंबई अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणासंदर्भात आतापर्यंत एक लाखांहून अधिक हरकती प्राप्त झाल्या असून, सर्व हरकतींवर सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल....

एल निनोची चाहूल; पाणी अडवण्याची हीच खरी वेळ

झुंजार सेनापती l मुंबई  'एल निनो' ही फक्त हवामानाची घटना नाही, ती मानवी समाजाची सत्वपरीक्षा आहे. शास्त्रज्ञांनी यंदा 'सुपर एल निनो'चा इशारा दिला आहे. त्यामुळे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!