spot_img
spot_img

परिवहन आयुक्त कार्यालयाचे वांद्र्यात स्थलांतर

झुंजार सेनापती l मुंबई

राज्याच्या मोटार वाहन विभागाचे मुख्यालय असलेले परिवहन आयुक्त कार्यालय आता फाउंटन येथून वांद्रे (पूर्व) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. नागरिकांनी नवीन पत्त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यापूर्वी हे कार्यालय टेलिकॉम इमारत क्रमांक २, महात्मा गांधी मार्ग, फाउंटन, मुंबई येथे कार्यरत होते. आता कार्यालय प्रशासकीय इमारत, चौथा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ येथे कार्यरत राहणार आहे.
कार्यालयाचा नवीन दूरध्वनी क्रमांक ०२२-२०८६३४०६ असा असून अधिकृत ई-मेल [email protected] हा आहे.
कार्यालयाच्या पत्त्यात झालेल्या बदलाची नोंद घेऊन पुढील सर्व कामकाजासाठी नवीन पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक परिवहन आयुक्त (निरीक्षण) कैलास कोठावदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!