spot_img
spot_img

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

⬤ झुंजार सेनापती l मुंबई, दि. १४ : विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई तसेच आमदार रविंद्र चव्हाण उपस्थित होते.
आज डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉ. प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनिल कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.
शपथविधीनंतर सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

‘तिसऱ्या मुंबई’त १५ लाख रोजगारांचे लक्ष्य!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई रायगड-अलिबाग, दि. २५ : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात...

दुष्काळग्रस्त भागात पोषण व आरोग्याच्या काळजीसाठी महिला व बालविकास विभाग सक्रिय

⬤ झुंजार सेनापती l मुंबई निसर्गातील बदल, वाढते तापमान आणि पावसाचा अभाव यामुळे राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा परिणाम केवळ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!