spot_img

कामगार विभागाच्या सेवा व योजनांची प्रक्रिया होणार सुलभ

२९ सेवा आणि १८ योजनांना मान्यता!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

कामगार विभागाच्या २९ सेवा आणि १८ योजनांच्या शासकीय प्रक्रियेची पुनर्रचना करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कामगार, नागरिक आणि व्यावसायिकांना विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कार्यालयीन फेऱ्या कमी होणार असून, अर्जातील रकाने, आवश्यक कागदपत्रे आणि मंजुरीचे टप्पेही मर्यादित केले जाणार आहेत. या सेवा व योजनांसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात येत असून, ते नजीकच्या काळात कार्यान्वित होणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय शासकीय प्रक्रिया पुनर्रचना समितीच्या बैठकीत कामगार विभागाच्या २९ जी-टू-बी आणि जी-टू-सी सेवा तसेच १८ योजनांच्या प्रक्रियेची पुनर्रचना करण्यास सहमती देण्यात आली होती. त्यानुसार १७ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.
या पुनर्रचनेत अर्जांची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, मंजुरीचे स्तर तसेच अंतिम सेवा मंजुरीसाठी लागणारे दाखले आणि प्रमाणपत्रांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. परिणामी सेवा मंजुरीचा कालावधी कमी होऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.
कामगार विभागाच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास कमी करणे आणि शासकीय प्रक्रिया अधिक लोकाभिमुख करणे, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

पशुधनासाठी चारा लागवडीला शासनाचे प्रोत्साहन; सात नवीन चारा पिकांचा योजनेत समावेश!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत वैयक्तिक तसेच...

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आधार व स्वयंम योजनांचे नूतनीकरण सुरू!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यातील ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ आणि ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ यांचा लाभ घेणाऱ्या विद्यमान विद्यार्थ्यांनी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!