spot_img
spot_img

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पूर्णियाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी याप्रकरणी आता मोठा खुलासा केला असून महेश पांडेय नावाच्या व्यक्तीला दिल्लीतून अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने वापरलेला मोबाईल आणि सिमही जप्त करण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पांडेय याचा कोणत्याही गँगशी काही संबंध नाही, त्याने याआधीही मोठ्या लोकांसोबत काम केलं आहे. जेव्हा महेशला पप्पू यादव यांच्याबाबतची माहिती मीडियाच्या माध्यमातून मिळाली, तेव्हा त्याने युएईमध्ये राहणाऱ्या आपल्या मेव्हणीचं सिम कार्ड वापरून हा सर्व कट रचला. लवकरच या प्रकरणात आणखी खुलासे होतील.

काही दिवसांपूर्वी पप्पू यादव यांनी अभिनेता सलमान खानला लॉरेन्स गँगकडून मिळालेल्या धमकी संदर्भात पोस्ट केली होती. पोस्टमध्ये त्यांनी लॉरेन्स गँगला आव्हान देत २४ तासांत त्याचं नेटवर्क उद्ध्वस्त केलं जाईल, असं म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवसांनंतर पप्पू यादव यांना एक कॉल आला जो महेशने स्वतः केला होता. यामध्ये पप्पू यादव यांना धमकी दिली. या धमकीनंतर त्यांनी केंद्राकडे आपली सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती.

Related Articles

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा वैमानिकावर ठपका

झुंजार सेनापती l मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतर एअरक्राफ्ट अपघात तपास ब्युरो यांचा २२ पानी प्राथमिक अहवाल जाहीर...

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक’चा लोढा करणार पुनर्विकास

झुंजार सेनापती l मुंबई |  मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मलबार हिल आणि कंबाला हिल परिसरातील सुमारे १७,४०३.२० चौरस मीटर भूखंडाच्या पुनर्विकासाचे हक्क मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!