spot_img
2.9 C
New York
Sunday, November 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

सामाजिक समता सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करणार

- सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार

 झुंजार सेनापती l मुंबई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती निमित्त ८ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व समाजघटकांनी सहभाग घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

समता पर्व सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर सर्व शासकीय वसतीगृहसर्व दिव्यांग शाळा व समाज कल्याण विभागांर्तगत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये व्याख्यानरक्तदान शिबिरविविध उपक्रमांच्या अनुषंगाने कार्यशाळा, विविध प्रबोधनकारक कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिक व महिला मेळावा इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाबरोबरच इतर समाजातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावाअसेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

सामाजिक समता सप्ताहात हे उपक्रम राबविले जाणार

➡️ दि. ९ एप्रिल२०२५ रोजी  विभागातील सर्व शाळामहाविद्यालयेशासकीय वसतिगृहे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचांरावर आधारित वक्तृत्व स्पर्धानिबंध स्पर्धालघुनाट्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार.

➡️ दि. १० एप्रिल२०२५ रोजी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये पथनाट्य व लघुनाटिका या द्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करण्यात येणार.

➡️ दि. ११ एप्रिल२०२५ रोजी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार.

➡️  दि. १२ एप्रिल२०२५ संविधान जागर भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देण्यात येत आहे तसेच संविधानाची निर्मितीसंविधान निमिर्ती समितीअनुच्छेदविशेषतः मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात येणार.

➡️  दि. १३ एप्रिल२०२५ रोजी प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर व ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात येत असूनजिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळामहाविद्यालयेशासकीय वसतिगृहे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार .

➡️  दि. १४ एप्रिल२०२५ रोजी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयेशाळामहाविद्यालये येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन व इतर कार्यक्रमव्याख्यानेचर्चासत्र इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  या दिवशी विभागातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात ऑनलाईन जातपडताळणी प्रमा

Related Articles

नागरिकांनो सतर्क राहून देशाच्या सुरक्षेचे कान आणि डोळे व्हा…

झुंजार सेनापती l मुंबई दहशतवादाविरुद्धचे युद्ध संपलेले नाही. या दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग आणि सतर्क असले पाहिजे. कान आणि डोळे बनून सुरक्षेचे...

क्रीडा युवक कल्याण विभागामार्फत ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन

झुंजार सेनापती l मुंबई शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!