spot_img

भगवान महावीर जन्म कल्याणक दिनाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १० : तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिनाच्या निमित्ताने त्यांना भक्तिपूर्वक नमन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भगवान महावीर यांचे जन्म कल्याणक पर्व सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी घेऊन येवो, अशी प्रार्थना करतानाच भगवान महावीर यांचे जीवन समाजाला सदैव प्रेरणा देत राहील. जगा व जगू द्या हा त्यांचा संदेश केवळ मानवतेसाठी नाही तर अखंड जीवसृष्टीच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही त्यांनी दिलेली पंचशील तत्वे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत राहतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Related Articles

पशुधनासाठी चारा लागवडीला शासनाचे प्रोत्साहन; सात नवीन चारा पिकांचा योजनेत समावेश!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत वैयक्तिक तसेच...

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आधार व स्वयंम योजनांचे नूतनीकरण सुरू!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यातील ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ आणि ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ यांचा लाभ घेणाऱ्या विद्यमान विद्यार्थ्यांनी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!