spot_img
25.9 C
New York
Tuesday, July 8, 2025

Buy now

spot_img

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भटक्या समाजाचे प्रश्न लावले

भटके विमुक्ताना राज्यात कोठेही मिळणार रेशनिंग

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्रआधारकार्डरेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करावे. तसेच या समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग दुकानातून धान्य उपलब्ध होईल अशाप्रकारे १५ मागण्यांबाबतचे निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले.

भटके विमुक्त समाजातील विविध प्रश्नांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीला भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे यांच्यासह राज्यातील भटके विमुक्त समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेभटक्या समाजातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन १५ प्रश्न तातडीने मार्गी लावले आहेत. गतवर्षी भटक्या समाजाच्या तांड्यावर दिवाळी साजरी केली होती. त्यांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावला. त्यामुळे राज्यभरात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गायरान जमीनीवर भटके समाजाची वस्ती आहे. याबाबत पंधरा दिवसात आराखडा सादर करावा. त्यांचाही प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल.

भटक्या समाजासाठी घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे :

 • जात प्रमाणपत्र गृहभेटी आधारावर देण्यात येणार.

• शाळामहाविद्यालयात मंडणगड पॅटर्नप्रमाणे जात दाखले द्यावेत.

• १९६१ पूर्वीचे जात कागदपत्र नसणाऱ्यांना गृहचौकशी आधारे जात प्रमाणपत्र द्यावे.

• भटकंती करणाऱ्या व्यक्तींना नायब तहसिलदारामार्फत ओळखपत्र द्यावे.

• विविध दाखले देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात यावे.

• १९५२ चा सवयीचा गुन्हेगार कायदा रद्द करण्याबाबत प्रस्ताव द्यावा.

• आधारकार्डसाठी कागदपत्रांचा पर्याय देण्यात यावा.

• तात्पुरते रेशनकार्ड देण्याऐवजी कायमस्वरुपी देण्यात यावे.

• सरकारी किंवा खासगी जमीनीवर वसलेल्या भटके समाजाचे सर्वेक्षण करावे.

• भटक्या समाजाला रेशनकार्ड देण्यात यावे.

• भटक्या समाजाचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार.

• जागा वाटपासाठी वस्तीनिहाय यादी सादर करावी.

• अन्याय अत्याचार प्रतिबंधक व संरक्षण समितीची स्थापना करुन तिची बैठक घेणार.

• भटके विमुक्तांना कसण्यासाठी पट्टे उपलब्ध करुन देणार.

Related Articles

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील  राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील...

फळपिक विमा योजनेचे अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

झुंजार सेनापती l मुंबई हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!